आधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी संविधान गरजेचे
महाराष्ट्र

आधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी संविधान गरजेचे

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भारताचे संविधान एक दुर्मीळ असे दस्ताऐवज असून आधुनिक नागरी समाजाच्या निर्मीतीसाठी संविधानाची गरज असल्याचा सूर ङ्गदेशदूतफव्यासपीठ कट्ट्यावर उमटला.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ङ्गदेशदूतफ कट्ट्यावर चर्चा करण्यासाठी साहित्यीक जयसींग वाघ, मु.जे.महाविद्यालयाचे प्रा. देवेंद्र इंगळे हे सहभागी झाले होते. यावेळी संपादक अनिल पाटील यांनी दोघा मान्यवरांचे स्वागत केले.

जयसींग वाघ म्हणाले की, 1917 पासून भारतीय संविधानाच्या निर्मीतीचा इतिहास आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिवाय संविधान लिहीले जाणार नाही असे वाटल्यानंतर बाबासाहेबांकडे संविधानाच्या निर्मीतीची जबाबदारी सोपवीण्यात आली होती. जगात भारताचे एकमेव संविधान असे आहे जे 100 वर्षे टिकले.

संविधानाची निर्मीती करतानाच ती अशा पध्दतीने करण्यात आली आहे की, ते कोणालाही बदलवीता येणार नाही. त्यामुळे संविधान बदलविण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी ते शक्य नाही. भारतात संविधानामुळेच हुकुमशाही येवू शकत नाही असेही ते म्हणाले.

प्रा. देवेंद्र इंगळे म्हणाले की, संविधान हे एक विशीष्ट दस्ताऐवज आहे. हा दस्ताऐवज 70 वर्षानंतरही जिवंत आहे. त्यामुळेच देशातील 130 कोटी नागरिकांच्या नागरिकत्वाची जोपासना संविधान करीत आहे.

ब्रिटीशांच्या सर्वात शक्तीशाली समाज्याविरोधात जो लढा उभा राहीला त्यातूनच संविधानाची निर्मीती झाली आहे. संविधानात व्यक्ती स्वातंत्र्याला फार मोठे महत्व दिले गेले. संविधानाची निर्मीती मोठ्या घणघोर चर्चेतून झाली आहे. लोकशाही प्रक्रीयेतून संविधानाची निर्मीती झाली आहे.

सामाजिक न्यायाचे तत्व, कल्याणकारी राज्याचे तत्व यामुळे संविधानाबाबत आस्था निर्माण झाली आहे. येणार्या काळातील आव्हाने पेलेल अशी आवश्यक लवचीकतादेखील संविधानाची निर्मीती करताना देण्यात आली होती. असेही ते म्हणाले.

ङ्गदेशदूतफ कट्टा लाईव्ह पाहणारे प्रेषक राहुल पाटील यांनी चर्चा सुरु असताना ऑनलाइन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रा. इंगळे म्हणाले की, संविधानाचे वाचन शाळा महाविद्यालयातून झाले तर आपल्यासमोर एक समाज म्हणून आदर्श उभे राहतील.

निरक्षरता, अंधश्रध्दा, समाजवाद या बाबी विचारात घेवूनच राज्यघटनेची निर्मीती करण्यात आली आहे. समाज जोपर्यंत लोकशाहीवादी समाज होत नाही तोपर्यंत संविधानाची यशपूर्ती होवू शकत नाही. असेही इंगळे यांनी सांगितले.

भारतात या पिढीला सर्व रेडीमेड मिळाले आहे. त्यामुळे संविधान, स्वातंत्र्याचे महत्व आजच्या पिढीला कळत नाही. प्रथम भारतीय अंतिमता भारतीय हे मुल्य प्रत्येक भारतीयाने जोपासने गरजेचे आहे.मुलगामी व्यवस्था परिर्वनाचा ध्येयवाद आदर्श मानून आपण वाटचाल केेली नाही तर ती संविधानासोबत प्रतारणा ठरेल असेही ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com