"काय ते रस्ते, काय ती घरपट्टी आणि काय ती स्मार्ट सिटी"

शहाजीबापूंचा तो डायलॉग आपल्या पाटीवर घेत महापालिकेला जोरदार चिमटे
"काय ते रस्ते, काय ती घरपट्टी आणि काय ती स्मार्ट सिटी"

पुणे(प्रतिनिधि)

काय झाडी, काय डोंगार, काय, हाटील या समाजमाध्यमात प्रसिद्ध झालेल्या वाक्याचा संदर्भ घेत काँग्रेसने....

काय ते रस्त्यावरचे खड्डे, काय ती घरपट्टी वाढ, काय ती पाणीपट्टीत वाढ आणि काय ती स्मार्ट सिटी, काय तो कोट्यवधींची घोटाळा एकदम ओके अशे मजकूर असलेले बॅनर लावत काँग्रेसने पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या ५ वर्षाच्या कामाची व्यथा नागरिकांसमोर मांडली आहे.

शहरातील स्वारगेट भागात उभारण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी उभारलेल्या या फलकाची सध्या चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाची २०१७ ते २०२२ या कालावधीत सत्ता होती. मात्र सत्ताकाळात भारतीय जनता पक्षाला शहर विकासाला गती देता आली नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

त्याचा संदर्भ घेत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी भाजपच्या कारभाराची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. काय ते रस्त्यावरचे खड्डे, काय ती घरपट्टीत वा, काय ती पाणीपट्टीत वाढ, काय ती स्मार्ट सिटी, काय तो कोट्यवधींचा घोटाळा, एकदम ओके असा मजकूर या फलकांवर उभारण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने पाच वर्षात केवळ गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय बालगुडे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com