Ajit Pawar : अजित पवारांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत गोंधळ

Ajit Pawar : अजित पवारांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत गोंधळ

कोल्हापूर | Kolhapur

कोल्हापुरात (Kolhapur) आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीत योगेश केदार यांच्या कार्यकर्त्यांनी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत गोंधळ घातला. तसेच पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली.

Ajit Pawar : अजित पवारांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत गोंधळ
मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर भाऊ-बहिणीचा आत्मदहनाच प्रयत्न; दोघेही पोलिसांच्या ताब्यात

यावेळी योगेश केदार आणि कार्यकर्त्यांनी बैठकीदरम्यान ही बैठक कोल्हापुरातील समाजासाठी आहे की राज्यातील मराठा समाजासाठी आहे, असा जाब अजित पवार यांना विचारला. सोबतच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी (Activists) टेबलवर हात आपटून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याठिकाणी पोलिसांचा (Police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Ajit Pawar : अजित पवारांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत गोंधळ
Independence Day 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी ध्वजारोहण

दरम्यान, बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना अजित पवार म्हणाले की, कोल्हापुरातील प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडून (Collector) जाणून घेतले. यावेळी विविध शिष्टमंडळांनी भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. सकल मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचे ऐकले. इतर भागातील काही लोक आले होते. त्या शिष्टमंडळाचे कलेक्टर आणि एसपी यांच्या समवेत त्यांचे बोलणं ऐकले, त्यावर मी देखील माझी मतं मांडली, असे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Ajit Pawar : अजित पवारांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत गोंधळ
“मेरे प्यारे परिवारजनों... ते विरोधकांवर निशाणा”; ९० मिनिटांच्या भाषणात काय काय बोलले मोदी?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com