आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक

आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक

मुंबई । Mumbai

मुंबईकरांसाठी (Mumbai news) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही आता हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Helmet In Mumbai)

दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनं हेल्मेट (Helmet) परिधान केलेलं नसेल तर कारवाई केली जाईल अशी माहिती देणारं पत्रकच मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहतूक शाखेनं काढलं आहे.

दरम्यान मुंबईत विनाहेल्मेट दुचाकी चालवण्याचं प्रमाण वाढल्यामुळे आता दुचाकी चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

येत्या १५ दिवसानंतर ही अंमलबजावणी होणार आहे. हेल्मेट न वापरल्यास ५०० रुपये दंड आणि ३ महिने लायसन्स निलंबित करण्याची तरतूद या नव्या नियमांतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुठेही जाताना बाईक चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com