उच्चदाब विद्युत वितरण प्रणालीचे कामे जलद गतीने पूर्ण करा - ऊर्जामंत्री राऊत यांचे निर्देश

उच्चदाब विद्युत वितरण प्रणालीचे कामे जलद गतीने पूर्ण करा - ऊर्जामंत्री राऊत यांचे निर्देश

मुंबई । प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेची (एचव्हीडीएस) कामे जलद गतीने करा. तसेच वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदाराना काळ्या यादीत टाका, असे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी महावितरणला दिले.

ऊर्जामंत्री राऊत यांनी आज मंत्रालयात उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी योजना राबविताना गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी कामाचे वेळोवेळी योग्य निरीक्षण करण्याची सूचना केली. मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून एचव्हीडीएसच्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विशेष घटक योजने अंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या अर्जदारांना वीज जोडण्या देण्यासाठी निधी उपलब्ध असून त्यासाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती कार्यालयाच्या माहिती पत्रकावर ठळकपणे नमूद करून याला व्यापक प्रसिद्दी देण्याची सूचना राऊत यांनी केली.

कोरोनाच्या काळात ही योजना राबविण्यात अडचणी निर्माण झाल्यात. त्या अडचणी दूर करीत यापुढे ही योजना जलदगतीने राबविण्यात यावी, असे राऊत म्हणाले. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com