झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र योजना उपाय सुचविणेसाठी समिती गठीत

समितीची बैठक बोलविण्याचा अधिकार अपर मुख्य सचिव (महसूल) यांना असेल
झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र योजना उपाय सुचविणेसाठी समिती गठीत

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारच्या गृह निर्माण विभागाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र करण्याकरिता योजना राबविण्याकरिता गृह निर्माण विभागाचे वतीने प्रयत्न होत आहेत.

धोरण ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.22 सप्टेंबर रोजी बैठक झाली. झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र चर्चा व सादरीकरण याबाबत उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र बद्दल सादरीकरण करण्यात आले. सदरहू बैठकीत झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सादर अभ्यास करुन उपाय योजना सुचविण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पुढील सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली समिती अशी...

1) अपर मुख्य सचिव,महसूल व वन विभाग-अध्यक्ष

2) प्रधान सचिव,गृहनिर्माण विभाग-सदस्य

3) प्रधान सचिव,नगर विकास विभाग(नवि 1)-सदस्य

4) प्रधान सचिव,नगरविकास विभाग(नवि 2) -सदस्य

5) नगरविकास विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-सदस्य

समितीची बैठक बोलविण्याचा अधिकार अपर मुख्य सचिव (महसूल) यांना असेल. समिती अभ्यास करुन याबाबतचा अहवाल शासनास सादर करील. सदर समितीला त्यांना आवश्यक वाटेल अशा व्यक्तींना विशेष निमंत्रित म्हणून बैठकीला निमंत्रित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com