रिक्त पदांची माहिती संकलित करा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

क्षेत्रीय स्तरावरील कार्यकारी पदे तातडीने भरणार
रिक्त पदांची माहिती संकलित करा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई । प्रतिनिधी

राज्य सरकारच्या ( State Govt Of Maharashtra ) विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे ( Vacant positions ) तातडीने भरण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी बुधवारी दिले. त्यानुसार गट अ, ब आणि क श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देणार आहेत.

एमपीएससी ( MPSC )मार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील एकूण १५ हजार ५११ पदांच्या भरतीस मान्यता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधिमंडळात केली होती. त्यानंतर त्यांनी आज हे आदेश दिले.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेतील उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त आणि लेखा अधिकाऱ्यांची पदे बऱ्याच काळापासून रिक्त असल्याची माहिती पुढे आल्यानंतर पवार यांनी सर्वच विभागांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वच विभागांमधील क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले.

कोकणात काम करण्यास उत्सुक असलेल्या अधिकाऱ्यांची पसंती घेऊन त्यांची प्राधान्याने नियुक्त करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com