
मुंबई | Mumbai
राज्यामध्ये वातावरणात (Weather) सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत चालला आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
या वातावरणाचा परिणाम शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढत चालला आहे. तर काही ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. या वाढत्या थंडीचा परिणाम जनजीवनावर मोठ्या प्रमाणात होत आहे.
वातावरणामध्ये सातत्याने बदल होत असल्याने याचा परिणाम जनसामान्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. सकाळी सर्वत्र दाट धुकेही होते. सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले नसून स्वेटर, मफलर, जॅकेट सर्वच जण वापरताना दिसून येत आहे. थंडीपासून बचावासाठी काही ठिकाणी शेकोट्या पेटविल्या गेल्या. दिवसभर चहाला मोठी मागणी होत आहे.
दरम्यान राज्यात मागच्या 24 तासांता पुणे 29.7 (14.8), जळगाव 22.7(12), धुळे 23 (7.6), कोल्हापूर 30 (18.8), महाबळेश्वर 24.3 (14.5), नाशिक - 13.2, निफाड 23.4 (10.5), सांगली 30.1 (17.8), सातारा 30.3 (17.5), सोलापूर 32 (17.6), सांताक्रूझ 30.2 (17.8), डहाणू 27 (15.9), रत्नागिरी 30.2 (21), औरंगाबाद 26.5 (13.2), परभणी 29.8 (16.6), अकोला 24.8 (17.5), अमरावती 24 (15), बुलडाणा 19.4 (13.3), ब्रह्मपुरी 21.2 (14.6), चंद्रपूर 27 (16.6), गडचिरोली 26.0(14.6), गोंदिया 20 (17.2), नागपूर 21 (15.1), वर्धा 24 (15), यवतमाळ 25.5 (15) तापमानाची नोंद झाली.