नेवासा l सुखदेव फुलारी

कोविड19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगीत केल्या होत्या त्या टप्प्यापासून दि. 4 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यास आदेश आहे. राज्य सहकारी निवडणुक प्राधिकारणाने दिले आहेत.

राज्य सहकारी निवडणुक प्राधिकारणाने बुधवार दि.30 डिसेंबर रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबद आदेश जारी केला आहे.त्यात म्हंटले आहे की, करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सहकारी संस्था निवडणूका घेणे उचित होणार नसल्यामुळे शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतुदीनुसार ज्या प्रकरणी उच्च-सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे. अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्यावर पुढील तीन महिन्यापर्यंत वेळोवेळी स्थगित केलेल्या आहेत. सदयस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रकिया दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत स्थगीत आहेत.

उच्च-सर्वोच्च न्यायालयाने सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे संदर्भात आदेशीत केलेले आहे अशा सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्यावर असेल त्या टण्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगीत केलेल्या आहेत. शासनाने पुनःश्च प्रारंभ अभियानांतर्गत निर्वध शिथिल करुन टाळेबंदी टप्प्याटण्याने उठवण्याचे घोरण स्वीकारलेले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था समितीची निवडणूका नियम 2014 चे नियम 3 (5) मधील तरतुदीनुसार निवडणूका सुरळीपणे व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अधिनियम व नियमातील तरतुदींशी सुसंगत आदेश-निर्देश देण्याचे अधिकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास प्राप्त आहेत. त्याचा वापर करून सहकारी संस्थांच्या निवडणूका निर्भय, मुक्त व मोकळ्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्राधिकरण खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कब व महाराष्ट्र सहकारी संस्था ( समितीची निवडणूका नियम 2014 चे नियम 3 (5) मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकरण ज्या प्रकरणी उच्च- सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घेणे संदर्भात आदेशीत केलेल्या खालील अनुसूचीतील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगीत केल्या होत्या त्या टप्प्यापासून दि.4 जानेवारी 2021पासून सुरू करण्यास आदेश देत आहे. सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना सामाजीक अंतर राखणे, मास्क वापर , सॅनीटायझेशन, थर्मल स्क्रीनींग इ. उपाययोजनांचा अवलंब करावा. तसेच करोना बाबत शासनाने घाऊन दिलेल्या नियमांचे पालन करावे.

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया 11 मार्च 2020 रोजी सुरू झाली होती.अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती, ती या पुढील टप्प्यावर सुरू होईल.

नगर जिल्ह्यातील महत्वाच्या सहकारी संस्था....

नगर जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक, नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना, भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ता महत्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रिक्रिया ज्या टप्प्यावर स्थिगीत करण्यात आल्या होत्या त्या टप्प्या पासून पुढे सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया 11 मार्च 2020 रोजी सुरू झाली होती.प्रारूप मतदान यादी प्रसिद्ध करण्याच्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती, ती आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या टप्प्यावर सुरू होईल.

मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया 11 मार्च 2020 पासून सुरू होऊन उमेदवारी अर्ज छाननी पूर्ण होऊन त्याच टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती, ती आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे टप्प्यावर सुरू करण्यात येणार आहे.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया 11 मार्च 2020 पासून सुरू होऊन उमेदवारी अर्ज भरणे प्रक्रिया पूर्ण झाल्याचे टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती,ती आता उमेदवारी अर्ज छाननीचे टप्प्यावर सुरू करण्यात येणार आहे.

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया 11 मार्च 2020 रोजी सुरू झाली होती.अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती, ती या पुढील टप्प्यावर सुरू होईल.