महागाईचा भडका! सीएनजी, पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

महागाईचा भडका! सीएनजी, पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

मुंबई | Mumbai

आधीच महागाईमुळे (inflation) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून ते पेट्रोल (petrol), डिझेलपर्यंत (disel) सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. आता आणखी एक भर पडली आहे.

महानगर गॅस लिमिटेडनं (Mahanagar Gas Limited) सीएनजी (CNG Price Hike) आणि पीएनजीच्या (PNG) किंमतीत वाढ केली आहे. मुंबईत सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG Price Hike) दरांमध्ये महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर प्रतिकिलो ६ रुपयांनी वाढवले आहेत. तर पीएनजीच्या दरांमध्ये किलोमागे ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ग्राहकांना सीएनजीसाठी प्रति किलोमागे ८६ रुपये असा दर मोजावा लागणार आहे. पीएनजीच्यासाठी प्रति किलो ५२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. (PNG CNG Rate in Mumbai) देशांमध्ये गॅसच्या वाढलेला किंमतीचा परिणाम म्हणून एमजीएच्या उत्पादनाच्या किंमतीवर होतो. त्याचाच एक परिणाम म्हणून सीएनजीचे दर आणि पीएनजीचे दर वाढले, असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com