महागाईत थोडासा दिलासा! राज्यात सीएनजी, पीएनजी स्वस्त

महागाईत थोडासा दिलासा! राज्यात सीएनजी, पीएनजी स्वस्त

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सीएनजी (CNG) इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (VAT) दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केल्याची घोषणा अर्थसंकल्पात (Budget) केली होती. त्यानुसार अधिसूचना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली होती....

अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार राज्यातील सीएनजी (CNG), पीएनजीसारख्या (PNG) नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (VAT) दर आज १ एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्यानं राज्यात घराघरांत पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचा सीएनजी इंधन स्वस्त झाला आहे, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून दिली आहे.

मुंबई (Mumbai) आणि परिसरात सीएनजी (CNG) प्रतिकिलो ६ रु. स्वस्त करण्यात आले आहे, पीएनजी (PNG) हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) ३ रु. ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. मुंबई परिसरात नवीन दराप्रमाणे सीएनजी ६० रु. प्रति किलो तर पीएनजी ३६ रु. प्रति एससीएम असणार आहे, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.