प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत आज निर्णय होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोविड टास्क फोर्ससोबत आज महत्त्वाची बैठक
प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत आज निर्णय होणार?

मुंबई | Mumbai

लोकल ट्रेन (Local Train) संदर्भात सुरू असलेल्या गेल्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीला अखेर न्याय मिळाला. मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local Train) स्वातंत्र्यादिनापासून (Independence Day) सर्वसामान्यांसाठी सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी केली. मात्रं मंदिरं (Temple), रेस्टॉरंट (Restaurant), मॉल्स (Malls) उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत आज निर्णय होणार?
Video : 'आम्ही राष्ट्रवादीला कधीही बुडवू'; भुजबळांचा संदर्भ घेत सेना खासदाराचे विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आज रात्री कोविड टास्क फोर्सची (COVID Task Force) बैठक होणार आहे. रात्री ८.३० वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि टास्क फोर्स मधील वरिष्ठ डॉक्टर (Task Force Doctors) आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुंबईकरांना कालच लोकल प्रवासाचा (Mumbai Local Train) दिलासा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रेस्टॉरंट, मॉल आणि दुकानांच्या वेळा वाढवण्याचा विचार करत आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील जनतेशी संवाद साधतांना मुख्यमंत्री म्हणाले होते की, रेस्टॉरंट, मॉल, मंदिरं याबाबत टास्कफोर्सशी (Task Force) चर्चा करून निर्णय घेऊ. महाराष्ट्रातील (Maharashtra ) जनतेने राज्य शासनाला आतापर्यंत सहकार्य केले म्हणूनच मुंबई मॉडेलचे, महाराष्ट्राचे कौतूक जगभर झाले. याचे सर्व श्रेय माझे नसून राज्यातील जनतेचे असल्याचेही ते म्हणाले होते.

दरम्यान लोकल प्रवासासाठी (Mumbai Local) दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात येईल. हे एकप्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट (Immunity certificate) असेल, या फोटो पासच्या आधारावरच तुम्हाला रेल्वेचा पास मिळेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे (BMC commissioner) आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Chahal) यांनी दिली. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com