यंदा दहीहंडी होणार?; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे गोविंदांचे लक्ष

यंदा दहीहंडी होणार?; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे गोविंदांचे लक्ष

मुंबई | Mumbai

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus second wave in maharashtra)) प्रादुर्भाव उतरणीला लागला आहे. त्यानुसार राज्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरीही सणांवर अजूनही बंदीच आहे.

दहीहंडी (Dahi Handi), गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) या सणांसाठी अवघे काही दिवस उरले असताना सणांसाठी निर्बंधांत सूट देण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) मुंबईतील प्रमुख गोविंदा पथकांसोबत (Govind Pathak) एक बैठक आयोजित केली आहे. ऑनलाईन (Online Meeting) होणारी ही बैठक दुपारी १२.३० वाजता होणार आहे.

यंदा ३१ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव (Dahihandi festival) आहे. त्यामुळं मागील वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव निर्बंधांत साजरा होणार का? की राज्य सरकारकडून (Maha Govt) दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार का हे आज स्पष्ट होणार आहे. छोट्या प्रमाणात का होईना दंडीहंडी साजरी करण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांनी केली आहे. यावर आज बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान करोना संकटामुळे (COVID19 crisis) अनेक सण, उत्सवांवर बंदी घालण्याची वेळ सरकारवर आली आहे. दसरा, दिवाळीसारखे मोठे सणही अत्यंत साधेपणाने साजरे केले जात आहेत. अशावेळी मनसेनं (MNS) मात्र दहीहंडी उत्सवासाठी शड्डू ठोकला आहे. करोनाचे सर्व नियम पाळत आणि योग्य खबरदारी घेऊन ३१ ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) आणि मनसे नेते अभिजित पानसे (Abhijeet Panse) यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com