मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात करोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले सध्या लॉकडाऊन नाही, पण कठोर निर्बंधाची उद्या, परवा घोषणा करणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “येत्या काही दिवसात मी तज्ज्ञांशी, पत्रकारांशी बोलेन. मला वेगळा उपाय काय तो सांगा. लॉकडाऊन हा उपाय नाही मान्य. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? चाचण्या वाढवा, लसीकरण वाढवा म्हणता, तो वाढवतोच आहे. पण परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला परत लॉकडाऊन करायचा की काय ही शक्यता आहे. ती अजूनही टळलेली नाही.”

आरोग्य सुविधा सुधारणं म्हणजे फर्निचर उभं करणं नाही, तज्त्ज्ञ डॉक्टर हवेत. लॉकडाऊन लावल्यावर रस्त्यावर उतरु जे म्हणतात, त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावं, त्यांनी मदतीसाठी रस्त्यावर उतरावं, आपल्याला ही लढाई हातात हात घालून लढावी लागेल.

परदेशात बिकट परिस्थिती

परदेशातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्समध्ये बिकट अवस्था, फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन आहे. केनिया, यूकेसारख्या अनेक देशात कडक लॉकडाऊन आहे.कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद, सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी, अशी फ्रान्समधील परिस्थिती आहे.

शिथिलता आल्यामुळे...

मुख्यमंत्री म्हणाले, मधल्या काळात आपण शिथिल झालो, लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलने सुरू झाले. कोरोना गेला, अशा रितीने सगळे सुरू होते. दुर्दैवाने जी भिती सगळे तज्ज्ञ व्यक्त करत होते, ती खरी ठरली. मार्चमध्ये गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ विक्राळ रुप धारण करून कोरोना आला आहे. हा विषाणू आपली परीक्षा बघतो आहे. आपल्याला धैर्याने एकत्र लढण्याची गरज आहे”, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुंबईची परिस्थिती आज आकडा ८ हजाराच्या पुढे गेला आहे. तो जानेवारी ३०० ते ४०० होते. महाराष्ट्रात रुग्णवाढ वेगाने होत आहे. विलगीकरण बेड २ लाख २० हजार आहेत. आता १ लाख ३७ हजार ५६० भरले आहेत. ICU बेड २० हजार ५१९ आहेत. ऑक्सिजन बेड ६२ टक्के आहेत २५ टक्के भरलेत, व्हेंटिलेटर ९५०० आहेत, ते सुद्धा भरत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधा अपुऱ्या पडतील.

काय म्हणाले मुख्यमंत्री

- लस घेणे, चाचण्या वाढवणे हे पुरसे उपाय नाही. रुग्ण कमी करण्यासाठी उपाय कोणी सांगत नाही.

- राज्यात चाचण्या ७५ हजारावरुन १ लाख ८५ हजार केली. येत्या काही दिवसांत २.५ लाख चाचण्या करणार.

- महाराष्ट्रात लष्कराच्या धर्तीवर रुग्णालये उभारली

- जानेवारीत मुंबईत ३००-४०० रुग्ण होते, ती संख्या आता ८ हजार ५०० गेली

- तीन लाख नागरिकांचे १ एप्रिल रोजी लसीकरण: आतापर्यंत ६५ लाख लाख नागरिकांचे लसीकरण

-महाराष्ट्रात शिरकाव झाला तेव्हा टेस्टिंगचे फक्त दोन लॅब होते. पण आज त्या दोनच्या पाचशे पर्यंत चाचण्या करणाऱ्या संस्था तयार केल्या आहेत.