
मुंबई | Mumbai
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी आज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची ट्रायल घेण्याकरता नागपूर ते शिर्डी असा प्रवास करणार आहेत.
विदर्भ, मराठवाड्याला जोडणारा हा समृद्धी महामार्ग प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या कामाच्या पूर्णत्वाकडे त्यांनी जातीने लक्ष दिलं होतं. मधल्या काळात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाचे काम रखडले होते. मात्र, आता जलद गतीने हे काम करून नागपूर ते शिर्डी असा मार्ग ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत.
समृद्धी महामार्ग हा एकूण 701 किमीचा लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणारा असा हा महामार्ग आहे. यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतीमान होईल. एकूण 120 मीटर रुंदीचा हा सहा पदरी महामार्ग असणार आहे.