'ईपीएफ'मधून ४० हजार कोटी काढले

राज्यातून सर्वाधिक पीएफ काढला
'ईपीएफ'मधून ४० हजार कोटी काढले

मुंबई | Mumbai

सध्या देशात तसेच राज्यात असलेल्या लॉक डाऊन मुळे परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे. यंदा नागरिकांवर आलेले करोना व्हायरसरुपी संकट सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याला हादरा देणारे ठरला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून हाताला काम नाही, नोकरीवर टांगती तलवार, जवळची बचतही संपली अशा द्विधा अवस्थेत सापडलेल्या नागरिकांनी आपला मोर्चा आता भविष्य निर्वाह निधी कडे वळविला आहे.

लॉकडाऊन काळात आर्थिक गर्तेत अडकलेल्या नागरिकांनी आतापर्यंत तब्बल ४० हजार कोटी रुपये भविष्य निर्वाह निधीतून काढले आहेत.

दरम्यान लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजेच २५ मार्च ते ३१ ऑगस्ट या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम काढण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी अधिवेशनात सांगितले आहे.

गंगवार यांनी माहिती देताना सांगितले की, भविष्य निर्वाह निधीतून सर्वाधिक रक्कम ही महाराष्ट्रातून काढण्यात आली. करोना व्हायरस लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातून तब्बल 7,837.85 कोटी रुपये इतकी रक्कम काढण्यात आली. महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली आणि तेलंगना राज्यातून कोटी रुपये इतकी रक्कम काढण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com