
मुंबई । Mumbai
सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे, ती म्हणजे, पुण्यातील (Pune News) कसबा (Kasba Peth Assembly Constituency) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (Chinchwad Assembly Constituency) पोटनिवडणूकीची. (Maharashtra By-Election 2023)
कसबा मतदार संघातील (Kasba Peth By-Election) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवड मतदारसंघातील (Chinchwad By-Election) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) या भाजपच्या दोन्ही आमदारांचं निधन झाल्याामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तर महाविकास आघाडी तिथं उमेदवार देणार, अशीही चर्चा सुरू आहे. अशातच आता निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण घोषणा केली असून कसबापेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये आयोगाने बदल केले आहेत.
या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. बारावीची परीक्षा असल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. बारावी आणि इतर परीक्षा असल्यामुळे मतदानासाठी केंद्र उपलब्ध होणे अवघड आहे.
ही गैरसोय टाळण्यासाठी एक दिवस आधीच मतदान घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होईल. या पोटनिवडणुकीचा निकाल ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजीच जाहीर होणार आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
31 जानेवारी अधिसूचना
7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
8 फेब्रुवारी अर्जांची छाननी
10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार
मतदान 26 फेब्रुवारी
निकाल 2 मार्च