मुख्यमंत्री ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया

मुख्यमंत्री ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई | Mumbai

मानदुखीच्या त्रासाने त्रस्त असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात (Reliance's Harkishandas Hospital) उपचारासाठी दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या अहवालानुसार डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता...

मुख्यमंत्र्यांवर आज शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार आज सकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया सुरू झाली होती. तासभर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

तसेच आठवडाभर विश्रांती केल्यानंतर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू होणार असल्याचेदेखील डॉक्टरांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com