मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द; उद्धव ठाकरे पुन्हा पुण्यात

मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द; उद्धव ठाकरे पुन्हा पुण्यात

पुणे | Pune

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. सरकार पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) स्वत:ही विविध भागांचा दौरा करत आहेत.

पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी व जिल्ह्यातील एकूण पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी निघालेले सातारा जिल्ह्याकडं निघालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात खराब हवामानाचा अडथळा आला आहे. मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणारं हवाई दलाचं हेलिकॉप्टर पुन्हा पुण्याला (Pune) परतलं आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याला ढगाळ वातवरणाचा फटका बसला असून मुख्यमंत्री ठाकरे कोयनानगरच्या (Koyananagar) दौऱ्यावर येण्यासाठी निघाले होते. मात्र, ढगाळ वातावरण व मुसळधार पावसामुळे त्यांचे हेलिकॉप्टर परत पुण्याकडे गेले आहे. दौरा रद्द झाला असला तरी कोयना नगर येथील दरडग्रस्त नागरिकांना मदत पोहोचवण्यास कसलाही विलंब न लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com