टाळेबंदी उठविण्याची घाई करणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्र

टाळेबंदी उठविण्याची घाई करणार नाही - मुख्यमंत्री

दुसरी लाट येऊ द्यायची नाही

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

राज्यात करोना संकट अजूनही कायम असल्यामुळे टाळेबंदी उठविण्याची कुठलीही घाई आपण करणार नाही. ज्या भागातून टाळेबंदी उठविण्यात आली आहे, तिथे ती पुन्हा एकदा लागू करायला हवी. करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी म्हटले आहे. Chief Minister Uddhav Thackeray

करोनावर आळा घालण्यासाठी गठित करण्यात आलेल्या कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी बैठक घेतली. या बैठकीत टाळेबंदी उठवण्याची घाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या संसर्गाबद्दल नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे. करोनाची लागण कुणालाही होऊ शकते. त्यामुळे जास्त आत्मविश्वास ठेवणे योग्य नाही. राज्यात करोनाची पहिली लाट आली आहे, आता दुसरी लाट येऊ द्यायची नाही. त्यामुळे संपूर्ण टाळेबंदी एकदम उठविण्याऐवजी आपण मिशन बिगिन अंतर्गत टप्प्याटप्प्याने मोकळीकची प्रक्रिया सुरू करीत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील काही शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाने टाळेबंदी उठविण्याची घाई केल्याचे दिसते. त्याचे परिणाम आता समोर येत आहेत. दररोज बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असून, ही स्थिती पुढे आणखी धोकादायक होऊ शकते. त्यामुळे टाळेबंदी कधी उठणार, याऐवजी ती टप्प्याटप्प्याने कशी उठविता येईल, हा प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझे तर असे मत आहे की, ज्या शहरांमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे, तिथे पुन्हा एकदा टाळेबंदी जाहीर करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com