मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र

गणेशोत्सवात सोशल डिस्टंसिंग पाळा

मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

करोनाचा धोका अजूनही कायम आहे. त्यातच आजपासून गणेशोत्सवाला सुरू झाली. गणरायाचे स्वागत करताना भौतिक दूरतेचा नियम विसरू नका, सोशल डिस्टंसिंग पाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. Ganeshotsav

मुखाच्छादन (मास्क) घाला आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. भौतिक दूरता हाच या महामारीवर सर्वोत्तम उपाय असल्याने, या नियमाचे काटेकोर पालन करा. आज माझ्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे. मी त्यांच्याकडे संपूर्ण जगाला करोनाच्या विळख्यातून मुक्त करण्याचे साकडे घातले आहे. हा दहा दिवसांचा उत्सव आपण सर्व आपल्या घरातच साजरा करू या, असे मुख्यमंत्र्यांनी गणेश पूजनानंतर आपल्या वर्षा निवासस्थानी सांगितले. Chief Minister Uddhav Thackeray appeal Follow social distance in Ganeshotsav

सुखकर्ता आणि विघ्नहर्ता हीच गणरायाची खरी ओळख आहे. आपल्यावर आलेल्या संकटाची जाणीव त्यालाही आहे. या स्थितीत आपले भक्त कशा प्रकारे व्यवहार करीत आहेत, ते स्वत:सोबतच इतरांचीही काळजी घेत आहेत का, याची तो परीक्षाच घेत आहे. आपल्यावर त्याचे लक्ष आहे आणि तो आपली परीक्षाही घेत आहे. दरवर्षीच आपण गणरायाचे भव्य स्वागत करतो, पण यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. माझे आपणास आवाहन आहे की, या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आपण नियमांचे पालन करू या, असेही ते म्हणाले.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा - स्वत:सोबतच इतरांची काळजी घेण्यासाठी मुखाच्छादन घालणे, दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर ठेवणे आणि हात वारंवार स्वच्छ धुणे आवश्यक आहे. यातही सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळा असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com