मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रूग्णालयात दाखल

मानेच्या दुखण्यावर होणार उपचार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रूग्णालयात दाखल

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांना गेल्या काही दिवसांपासून मानेचा आणि मणक्याचा त्रास जाणवत आहे.त्यामुळे उपचारासाठी बुधवारी संध्याकाळी एका खाजगी रूग्णालयात दाखल झाले.admitted to hospital. पुढील दोन ते तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार असून ठाकरे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.जनतेच्या आशीर्वादाने माझी तब्येत लवकरच बरी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मानेचा आणि मणक्याचा त्रास Neck pain जाणवायला लागला होता.गेल्या दोन वर्षांत करोनामुळे त क्षणभराचीही उसंत मिळाली नाही.त्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

एकीकडे करोना विषाणूची लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे. राज्यातली विकास कामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हटले तरी थोडेसे दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, करोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com