पुण्यात नवले पुलावर विचित्र अपघात; CM शिंदेनी दिले 'हे' निर्देश

पुण्यात नवले पुलावर विचित्र अपघात; CM शिंदेनी दिले 'हे' निर्देश

मुंबई | Mumbai

पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर झालेल्या अपघातात टँकर चालकाने ४८ वाहनांना धडक दिली. यानंतर या गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून याबाबत चौकशीचे आदेशही दिले आहेत. एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, पुण्यातील नवले ब्रिज येथे आज रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश दिले आहे.

या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील स्थानिक प्रशासनाला दिल्या असून या अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक मनीलाल यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चालक उत्तर प्रदेशचा चालक आहे, तो सद्या फरार असून काल रात्री झालेल्या अपघातप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com