Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक; आमरण उपोषणाचा इशारा

Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक; आमरण उपोषणाचा इशारा

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

मराठा आरक्षण (Maratha Reservation) तसेच मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण (Agitation) करण्याचा इशारा छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी सोमवारी येथे दिला...

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून (State Government) कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे मुंबईत (Mumbai) आझाद मैदानात (Azad Maidan) उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे संभाजीराजेंनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय नोकरीत टिकणारे आरक्षण (Reservation) द्यावे, अशी सर्व पक्षांना माझी हात जोडून विनंती आहे. न्यायालयात मराठा आरक्षण कशामुळे गेले हे सांगितले. परंतु यासंदर्भात राज्य सरकारकडून काहीच हालचाल झाली नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर पुनर्विचार याचिका देखल करा, असे देखील मी सांगितले होते.

Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक; आमरण उपोषणाचा इशारा
शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'अशी' आहे नियमावली

मात्र, सरकारने (Government) उशीराने पुनर्विचार याचिका दाखल केली. या याचिकेची काय परिस्थिती आहे, हे कोणालाच काही माहिती नाही. यासंदर्भात समिती स्थापन करा, असे माझे स्पष्ट मत असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

आरक्षण (Reservation) ५० टक्क्यांवर द्यायचे असेल तर त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती असायला हवी, असे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) म्हटले. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे. मराठा आरक्षणासाठी मी २००७ पासून संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) पिंजून काढला. मराठा समाज वंचित घटक आहे. मी मराठा (Maratha) आहे, त्यामुळे मी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढत आहे, असेही ते म्हणाले.

Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक; आमरण उपोषणाचा इशारा
साडे तीन लोकांच्या अटकेसाठी उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?; किरीट सोमय्यांचा टोला

मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्तीचा पर्याय शक्य आहे. आरक्षणासाठी आपण महाराष्ट्र पेटवू शकतो. पण मला तसे करायचे नाही, असे स्पष्ट करताना मराठा आरक्षणाच्या अंतर्गत निवड झालेल्या तरुणांना नियुक्ती द्यायला काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी केला.

कोपर्डीच्या खटल्याचा निकाल लागून अनेक वर्ष झाली. त्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना नोकरी देण्याची मागणी प्रलंबित आहे.

Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक; आमरण उपोषणाचा इशारा
रासबिहारी-मेरी लिंक रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाच्या मागण्या त्वरित सोडवल्या नाहीत तर २६ फेब्रुवारीपासून आपण पूर्णपणे अन्नत्याग करणार आहोत. आझाद मैदानावर मी एकटा आमरण उपोषण (Agitation) करणार असल्याचे संभाजीराजेंनी यावेळी सांगितले.

Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक; आमरण उपोषणाचा इशारा
Visual Story : ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं वाढदिवशीच उरकला साखरपुडा; फोटोज व्हायरल

संभाजीराजे यांच्या मागण्या

  • मराठा आरक्षणामुळे २०१४ ते ५ मे २०२१ पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी.

  • ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा.

  • सारथी संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरु करावीत. त्याअतंर्गत प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेची उपकेंद्र सुरु करुन त्याठिकाणी शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. संस्थेसाठी एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तत्काळ सुरु करावा.

  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी मिळावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची १० लाख रुपयांची मर्यादा वाढवून ती किमान २५ लाख रुपये करावी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com