जवान चंदू चव्हाण पुन्हा सैन्यदलात दाखल
महाराष्ट्र

जवान चंदू चव्हाण पुन्हा सैन्यदलात दाखल

Balvant Gaikwad

धुळे  – 

चुकून पाकिस्तानची सिमारेषा ओलांडून गेलेला जवान चंदु चव्हाण यांना सैन्यदलाच्या सेनेतून कमी केले होते. त्यानंतर चव्हाण यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर त्यांना पुन्हा सैन्यदलाच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे. त्यामुळे आज शहरातील महाराणा प्रताप चौकात चंदु चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम हिंदु युवा शक्ती, संस्कार 1001 युवा प्रतिष्ठान, धुळे जिल्हा मराठा क्रांती युवा मोर्चा आणि प्रदिप भाऊसाहेब मित्र परिवार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी चंदुचव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदीप जाधव, हर्षल परदेशी, संदीप चौधरी, गुलाब माळी, किशोर पवार, रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com