राज्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

अहमदनगरसह विविध जिल्ह्यांमध्ये आज पावसाची हजेरी
राज्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई / Mumbai - राज्यात पुढचे दोन दिवस कोकणात (Konkan) बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस (heavy rain) तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसानंतर पावसाच्या या आगमनामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

नागपूरात (nagpur) आज सलग आठ तास मुसळधार पाऊस झाला. अनेक टिकाणी खोलगट भागात पावसाचं पाणी शिरलं असून पाणी काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेतली जात आहे. नागनदीचं पात्र भरून वाहत असून नदीकाठचे नागरिक सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. हवामान विभागानं आज नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित केला असून उद्याही विजेच्या कडकडाट सह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसाच्या खंडानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली असून जिल्ह्यात सर्वदूर पाऊससरी कोसळत आहे.

अकोल्यातही पावसाला सुरवात झाली असून काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज पावसाने जोरदार हजेरी लावली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com