
मुंबई - रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोडसाळ आरोप करीत आहे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. केंद्राकडे बोट दाखवुन आपले अपयश लपवू शकत नाही. करोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे आरोपांचे राजकारण कोणी करू नये