नांदेड, संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूंची केंद्राकडून दखल

नांदेड, संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूंची केंद्राकडून दखल

मुंबई | Mumbai

कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच नांदेडच्या (Nanded) डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात (Dr. Shankarao Chavan Government Hospital) मागील 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतकेच नाहीतर आज छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान नांदेडसह छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंची दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे. रुग्णांच्या मृत्यूबाबत रुग्णालय प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. तसेच, राज्यातील शासकीय रुग्णालयांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासनही डॉ. भारती पवार यांनी दिले आहे.

नांदेड, संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूंची केंद्राकडून दखल
'समृद्धी' महामार्गाच्या टोल नाक्यावरील परप्रांतीय मॅनेजरला मनसैनिकांकडून चोप

प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या, नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणाची दखल केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. या घटना अतिशय दुर्दैवी असून अत्यवस्थ, अपघात आणि इतर गंभीर आजारांचे रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा नसावा, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अहवाल मागवला जाईल. डॉ. भारती पवार म्हणाल्या, नांदेड व छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले आहे. त्यांच्याकडून रुग्णांच्या मृत्यूबाबत खुलासा मागवला आहे. नेमके कोणते पेशंट होते? कधी अ‌ॅडमिट झाले होते? ही सर्व माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. केंद्र सरकार राज्यांना आरोग्याच्या बाबतीत मदत करण्यासाठी तत्पर आहे. महाराष्ट्रातील रुग्णालयांनाही केंद्र सरकारकडून मदत केली जाईल, असे आश्वासनही डॉ. भारती पवार यांनी दिले. डॉ. भारती पवार म्हणाल्या, राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी केंद्राकडून निधी दिला जातो. राज्यातील शासकीय रुग्णालयांची माहिती घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत दिली जाईल.

नांदेड, संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूंची केंद्राकडून दखल
GPS वर डोळे झाकून विश्वास ठेवला अन् 2 डॉक्टर्सच आयुष्य संपलं, रस्ता समजून ते…..

दरम्यान, राज्यातील शासकीय रुग्णालयांत निधीअभावी औषधांचा तुटवडा पडल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हाफकिनने औषध खरेदी केल्याने रुग्णालयांत औषधांचा तुटवडा असल्याचा आरोप केला आहे. यावर डॉ. भारती पवार म्हणाल्या, औषधांच्या तुटवड्याबाबत आमच्याकडे काही तक्रार नाही. औषधांचा पुरवठा हाफकिनच्या माध्यमातून सुरु आहे. या व्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाकडेदेखील यासाठी निधी असतो. त्यामुळे संभाजीनगर आणि नांदेडच्या घटनेत औषधांचा तुटवडा असेल, असे दिसत नाही. नेमके मृत्यू कशामुळे झाले, हे अहवाल आल्यावरच कळेल. शासकीय रुग्णालयांच्या दुरावस्थेबाबत डॉ. भारती पवार म्हणाल्या, एनएमसीच्या गाईडलाईन्स असून त्यांच्याकडून सातत्याने शासकीय रुग्णालयांची तपासणी होत असते. चुकीच्या पद्धतीने मेडिकल कॉलेज चालत असेल तर कारवाई केली जाते. जिथे सुविधा नसतील, अशा मेडिकल कॉलेजला परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांवर सरकारचे लक्ष आहे.

नांदेड, संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूंची केंद्राकडून दखल
धक्कादायक! खाजगी बसमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com