नवी दिल्ली l New Delhi (सुरेखा टाकसाळ) :

महाराष्ट्र व अन्य चार राज्यांमध्ये करोनाच्या वाढत्या मामल्यांवर नियंत्रणासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने नवीन आदेश न नियम जारी केले आहेत. या आदेश व नियमांची कठोर अंमलबजावणी या राज्यांकडून होणे अपेक्षित आहे.

केरळ, महाराष्ट्र याच्या पाठोपाठ पंजाब, मध्य प्रदेश व छत्तीसगढ या राज्यातील कोविड-१९चे मामले वाढत असल्याबद्दल केंद्र सरकार चिंतीत आहे. केंद्रा तर्फे दिलेल्या आदेशांनुसार वरील राज्यांना करोना संसर्गाच्या पाहणीवर तसेच, करोनामुळे अधिक मृत्यु झालेल्या जिल्ह्यांमध्ये क्लिनिकल/वैद्यकीय उपचार व्यवस्थापनावर जोर देण्यास सांगण्यात आले आहे.

आर टी-पीसीआर चांचण्या आणि गरज पडल्यास प्रतिबंधित क्षेत्रे, यांची संख्या वाढवा, रॅपिड अँँन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना देखील आर टी पी सी आर चांचणी सक्तीची करा, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. व या सर्व आदेश व नियमांचे कठोर पालन करण्यास राज्यांनी सांगण्यात आले आहे.

करोनाचा संसर्ग काबूत आणण्यासाठी आजही मास्कचा वापर, सामाजिक दूरी व स्वच्छतेचे पालन अत्यंत आवश्यक आहे. मात्र लोक बेपर्वाईने वागत असून वरील नियंमांचे काटेकोर पालन करीत नसल्यामुळे करोनाच्या मामल्यांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे सांगितले जाते.

आज पर्यंत देशात १ कोटी ६ लाख पेक्षा अधिकजण करोना मधून बरे झाले आहेत. १ कोटी ७० लाख पेक्षा अधिक व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोविड-१९ मधून बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के तर करोनामुळे होणाऱ्या मृत्युचा दर १.४२ वर आला आहे.