गव्हाचा पुरवठा वाढविण्यासाठी केंद्राचा प्रयत्न

गव्हाचा पुरवठा वाढविण्यासाठी केंद्राचा प्रयत्न

नवी दिल्ली | New Delhi

भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation of India), खुल्या बाजारात, 18.05  लाख मेट्रिक टन गव्हाची (wheat) विक्री पूर्ण केली आहे. देशात गहू आणि पीठाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा फटका ग्राहकांना बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर, गव्हाचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने, 25 जानेवारी 2023 रोजी 30 लाख मेट्रिक टन (metric tons) गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार ही विक्री करण्यात आली. खरेदी झालेल्या गव्हापैकी, सुमारे 11 लाख मेट्रिक टन गहू बाजारात आला आहे त्यामुळे देशभरात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती आता थोड्या कमी झाल्या आहेत.

गव्हाचा पुरवठा वाढविण्यासाठी केंद्राचा प्रयत्न
सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली लाखोंची फसवणूक

उल्लेखनीय बाब म्हणजे,  भारतीय अन्न महामंडळाने, 23 राज्यांमध्ये 620 ठिकाणी झालेल्या तिसर्‍या ई-लिलावात 5.07 लाख मेट्रिक टन गहू 1269 व्यापाऱ्यांना  साधारण 2172/ क्विंटल या  सरासरी किमतीला विकला. 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

तिसऱ्या लिलावात अन्न महामंडळाने  22 फेब्रुवारी 2023 रोजी 11.79 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजारात अनुक्रमे 2150/क्विंटल राखीव किमतीत आणि  2125/क्विंटल  वाजवी सरासरी दर्जा (FAQ) आणि काही दर्जात विशिष्ट सवलती (URS) अशा श्रेणीत, विक्रीसाठी उतरवला.

गव्हाची ई-लिलावतून (E-auction) होणारी ही खुली विक्री, 15 मार्च पर्यंत दर बुधवारी, केली जाणार असून ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी गहू बाजारात उपलब्ध करुन देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे.  

गव्हाचा पुरवठा वाढविण्यासाठी केंद्राचा प्रयत्न
नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

एक आणि दोन फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या लिलावात, 9.13 लाख मेट्रिक टन गहू 1016 व्यापाऱ्यांना 2474/क्विंटल या सरासरी दराने विकण्यात आला. त्याचप्रमाणे, 15 फेब्रुवारीला झालेल्या दुसऱ्या लिलावात, 3.85 लाख मेट्रिक टन गहू 1060 व्यापाऱ्यांना 2338/ क्विंटल ह्या दराने विकण्यात आला. बहुतांश बोली लावणाऱ्यांनी 100 ते 500 मेट्रिक टन अशा प्रमाणात गहू खरेदी करुन, गहू आणि पिठाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नास हातभार लावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com