Nanded Hospital News : नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूतांडव; डीन आणि प्रसुती विभाग प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल

Nanded Hospital News : नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूतांडव; डीन आणि प्रसुती विभाग प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल

नांदेड | Nanded

दोन दिवसांपूर्वी नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात 24 तासांत 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरदेखील हे मृत्युसत्र थांबले नाही. दुसऱ्यादिवशीदेखील आणखी 6 रूग्णांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसात 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात मोठी खळबळ माजली होती. मृतांमध्ये 12 बालकांचादेखील समावेश होता.

आता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304 आणि 34 अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nanded Hospital News : नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूतांडव; डीन आणि प्रसुती विभाग प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल
NCP Crisis : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार, अजित पवार गटाला नोटीस; उद्या सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश

या घटनेनंतर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली होती. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पाहण्यास मिळाले. यानंतर पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले होते.

तसेच पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाटील यांच्यावर सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर पाटील यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nanded Hospital News : नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूतांडव; डीन आणि प्रसुती विभाग प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल
Sikkim Cloud Burst : सिक्कीमच्या महाप्रलयात ८ जवानांसह २२ जणांचा मृत्यू; तीन हजार पर्यटक अडकले
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com