साताऱ्यात राडा; उदयनराजे, शिवेंद्रराजेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

साताऱ्यात राडा; उदयनराजे, शिवेंद्रराजेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सातारा | Satara

येथे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमीपूजनावरून आमनेसामने आले होते. आता उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवेंद्रराजे भोसलेंसह ८१ जणांवर तर उदयनराजेंसह ४५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र उदयनराजेंच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विरोध करत तो उधळून लावण्यात आला. बाजार समितीच्या जागेवरून हा वाद आहे.

साताऱ्यात राडा; उदयनराजे, शिवेंद्रराजेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Nashik Accident News : कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, थरारक Video आला समोर

खासदार उदयनराजे यांचे कुळ असणारे शेतकरी संपत जाधव यांनी बेकायदेशीर जमाव जमवून वहिवाट दाराच्या जागेत येऊन दमदाटी केल्या प्रकरणी 51 ओळखीचे आणि 25 ते 30 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला.

तर शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 45 जणांच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

साताऱ्यात राडा; उदयनराजे, शिवेंद्रराजेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Nashik News : युवकाची स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com