पुणे (प्रतिनिधी) -

एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शर्जील उस्मानी याच्याविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा

दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप हरिभाऊ गावडे (वय 28) यांनी तक्रार दिली आहे.

30 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठातील तरुण शर्जील उस्मानी याने भाषण देताना भारतीय संघराज्य विरोधात व हिंदू समाजाविरोधात आपत्तीजनक व भडकाऊ विधान केले होते. शर्जील उस्मानी याने आपल्या भाषणात " आज का हिंदू समाज, हिंदुस्तान मे हिंदू समाज पुरी तरहा से सड चुका है, ये जो लोग लिंचिंग करते है, कत्तल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नई तरीके से हाथ धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे, क्या करते है लोग की वापस आ कर हमारे बीच खाना खाते है, उठते बैठते है, फिल्म देखते है, अगले दिन फिर किसी को पकडते, फिर कत्तल करते है और नॉर्मल लाईफ जीते है. अपने घर मे मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर मे पूजा भी कर रहे है, फिर बाहर कर यही करते है" अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.

शर्जील उस्मानीच्या या वक्तव्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या, भारतीय न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवला, भारतीय संघराज्याचा अवमान केला म्हणून त्याच्याविरोधात कलम 153 (अ) अंतर्गत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.