दहावीनंतर काय? गोंधळात पडला असाल तर नक्की वाचा

विद्यार्थ्यांच्या (students) शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दहावीच्या शालांत परिक्षेचा निकाल जाहीर (ssc result) झाला आहे
दहावीनंतर काय? गोंधळात पडला असाल तर नक्की वाचा

अहमदनगर | Ahmednagar

विद्यार्थ्यांच्या (students) शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दहावीच्या शालांत परिक्षेचा निकाल जाहीर (ssc result) झाला आहे. ऐतिहासिक म्हणता येईल, अशा स्वरुपाचा यंदाचा दहावीचा निकाल आहे. दहावीची परिक्षा होणार होती, त्यावेळी कोरोना व्हायरसची (corona virus) दुसरी लाट (second wave) प्रभावी झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे यंदा दहावीच्या परिक्षेचा निकाल लावण्यात आला आहे.

दहावी हा आपल्या करिअरचा, व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पाया मानला जातो. आजही आपण पारंपरिक शिक्षण पद्धतीचे पालन करीत असल्याने साधारण आठवी-नववीच्या वर्षातच पुढे काय याची दिशा काही प्रमाणात ठरलेली असते. अनेकदा अपेक्षेपेक्षा अधिक तर बहुतेकवेळा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतात अन् ठरलेल्या फॅकल्टीपेक्षा वेगळा मार्ग निवडायचा का असे प्रश्न उभे राहतात. अशा सर्वच संभ्रमात असणा-यांना काहीसे मार्गदर्शक ठरेल याकरिताच दहावीनंतर पुढे काय याचा घेतलेला धांडोळा..

​​सायन्स शाखा (Science)

सायन्स शाखेची निवड आजही पारंपरिक मेडिकलकरिताच केली जाते. यातही एमबीबीएस हा महत्त्वाचा भाग असतो. १२ वी सायन्सनंतर मेडिकलमधल्याच अनेक फॅकल्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात, त्यापैकी डीएमएलटी, एमएलटी, एक्सरे टेक्निशियन, फार्मसी, रिसर्च आदी शाखांकडे विद्यार्थ्यांना जाता येते. याशिवाय बीएस्सी केल्यानंतर कृषी पदवीकडे वळता येतेच, शिवाय जीवशास्त्रातील आधुनिक वाटा आपल्याशा करता येतात. १२ वी सायन्सनंतर विद्यार्थी विधी शाखेसह संगणक शाखेकडेही वळू शकतो. संगणक पदवी शिक्षणात सध्या अनेक विधिध संधी उपलब्ध आहेत.

पीसीएमबी - बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांवर आधारित बायो केमिस्ट्री, बायो मेडिकल इंजिनीअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी अशा विषयांकडे जाता येतं.

पीसीएम - या विषयांनुसार आर्किटेक्चर, डिफेन्स, नेव्ही, इंजिनीअरिंग, पायलट ट्रेनिंग, टेक्नॉलॉजीकडे वळता येतं.

पीसीबी - मेडिकल, व्हेटर्नरी सायन्स अॅण्ड अॅनिमल हजबण्डरी, पॅरामेडिकल कोर्सेस, अॅग्रीकल्चर सायन्स अशा विषयांसाठी हा ग्रुप उपयोगी पडतो.

एव्हिएशन, फूड सायन्स, फोरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्स, मॅथमेटिक्स यात पदवी अभ्यासक्रम करता येतो. हे सर्व कोर्स चार ते पाच वर्षांचे असून त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

वाणिज्य शाखा (Commerce)

वाणिज्य शाखा ही बहुपर्यायी मानली जाते. एकतर कॉमर्सची पदवी घेत असतानाच, सी.ए. बेसिक प्रोग्रॅम कोर्स करता येतात, कंपनी सेक्रेटरी, टॅक्स कन्सल्टंट, विधी शाखा, बँक परीक्षा, फायनान्स विभाग, आदी अनेक पर्याय या विभागात उपलब्ध आहेत. कॉमर्स पदवीनंतर विद्यार्थ्यांना एमबीए आणि संगणक विभागाकडेही वळता येते. सध्या एमबीएमध्ये एचआर, फायनान्स अन् मार्केटिंगकरिता उत्तम वातावरण आहे.

कला शाखा (Art)

कला शाखेतून भारतीय संगीत, गायन, वादन, अभिनय, साहित्य, विद्या, भाषा, या पारंपरिक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम अन् आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध आहेत. १२ वीनंतर स्पेशलायझेशन करता येते. या सर्व अभ्यासक्रमांना भारतासह इतर देशांतही मागणी आहे. याशिवाय १२ वीनंतर विद्यार्थी विधी शाखेकडे वळू शकतो, विधी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक पर्याय नोकरीच्या अन् करिअरच्या, मास्टरकीच्या, सरकारी तसेच खासगी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. १२ वी कलेची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना डीएड, बी.एड, बीपीएड आदी पर्यायही खुले आहेत. शिवाय कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी एम.ए, एमफीएल, डॉक्टरकी आदींच्या माध्यामातून प्राध्यापकी करू शकतात. याशिवाय आर्ट्स स्कूलच्या माध्यमातून करिअर करीत आपल्यातील हस्तकौशल्याला वाव देण्याचाही एक पर्याय या विद्यार्थ्यांसमोर आहेच.

आयटीआय (ITI)

आयटी खूप लोकप्रिय आहेत. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड आहेत, जे विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार निवडू शकतात. काही लोकप्रिय कोर्स पुढीलप्रमाणे

- आयटी टर्नर

- आयआयटी मेकॅनिक

- आयटी वेल्डर

- आयटी प्लंबर

- आयटीआय इलेक्ट्रीशियन

डिप्लोमा (Diploma)

दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा करू शकतात, त्यासाठी दहावीत गणित व विज्ञान विषय विद्यार्थ्यांनी घेतलेले असावेत. हे डिप्लोमा कोर्स ३ वर्षांचे असतात. आम्ही अशा काही डिप्लोमा अभ्यासक्रमांची नावे पुढे देत आहोत.

- डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग

- डिप्लोमा इन टेक्सटाइल इंजीनियरिंग

- डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग

- डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग

- डिप्लोमा इन सिविल इंजीनियरिंग

- डिप्लोमा इन आयसी इंजीनियरिंग

- डिप्लोमा इन ईसी इंजीनियरिंग

- डिप्लोमा इन माइनिंग इंजीनियरिंग

या डिप्लोमा अभ्यासक्रमांनंतर विद्यार्थ्यांना थेट इंजिनीअरिंगच्या पदवीला प्रवेश मिळतो.

​फाइन आर्ट्स / परफॉर्मिंग आर्ट्स (Fine Arts / Performing Arts)

आर्ट अँड क्राफ्ट, सिरॅमिक अँड पॉटरी, डान्स, ड्रॉइंग, फर्निचर अँड इंटेरिअर डिझाइन, म्युझिक, स्कल्प्चर अशा कलेशी संबंधित विषयांमध्येही करिअर होऊ शकतं. मात्र त्यासाठी विषयाची आवड आणि कौशल्य लागतं. लहानपणापासून या विषयांचा अभ्यास केला तर त्यात करिअरसाठी उत्तम संधी आहेत.

बॅचलर इन डिझायनिंग (Bachelor in Designing)

काळानुरुप प्रत्येक वस्तूचं डिझाइन बदलत राहतं. प्रत्येक वस्तू वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केली जाते. हे डिझाइन करण्यासाठी प्रोडक्ट डिझाइन, फर्निचर अँड इंटिरिअर डिझाइन, सिरॅमिक अँड ग्लास डिझाइन, ग्राफिक डिझाइन, ऍनिमेशन, व्हिडिओ कम्युनिकेशन अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मात्र यासाठी केवळ चित्रकला पुरेशी नसून कल्पनाशक्तीची गरज असते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com