<p><strong>मुंबई -</strong></p><p> मराठा आरक्षण आंदोलनातले गंभीर स्वरुप नसलेले सर्व गुन्हेे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती</p>.<p>सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन केलं होतं. मूक मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रभर काढण्यात आले होते. या दरम्यान काही गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातले 26 गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे असून ते न्यायप्रविष्ट आहेत. गंभीर स्वरुपाचे नसलेले सर्व गुन्हे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.</p>