“कामावर तात्काळ रुजू व्हा, अन्यथा…”; न्यायालयाचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

“कामावर तात्काळ रुजू व्हा, अन्यथा…”; न्यायालयाचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

मुंबई | Mumbai

एसटी महामंडळ (maharashtra st bus) राज्य सरकारमध्ये (mva government) विलीन करून घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी (ST bus workers strike) काम बंद आंदोलन पुकारले आहे. न्यायालयाने मनाई करूनही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतलेली नसून, संप चिघळला आहे.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.

तसेच राज्य सरकारला तुमच्या मागण्यांविषयी विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊ, असे संकेतही उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित याचिकेवर उद्या दुपारी अडीच वाजता पुन्हा सुनावणी ठेवली आहे.

तसेच सणासुदीच्या काळाच सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य नाही आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घ्यावा. संप करण्याचा प्रयत्न केल्यास ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना द्यावे लागतील, असा इशारा उच्च न्यायालयाने एसटी संघटनेला दिला आहे. त्यामुळे उद्या उच्च न्यायालय याबाबत काय निकाल देते, यावर संपाच भवितव्य अवलंबून असेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com