महाराष्ट्रातील हे मंत्री करोना बाधित
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील हे मंत्री करोना बाधित

त्यांनी स्वतः याबाबत ट्विटरद्वारे दिली माहिती

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

राज्यात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य सरकारमधील काही मंत्री, आमदार देखील करोना बाधित आढळले होते. यामध्ये आणखी एका मंत्र्याच्या समावेश झाला आहे. राज्याचे वस्त्रोद्योग व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे करोना बाधित आढळले आहे. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी माहिती देताना म्हंटले आहे, " माझी Covid19 चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला विलागिकरण कक्षात ठेवले आहे. माझ्याशी संपर्क आलेल्या सर्वांना स्वतःची चाचणी करून घेण्याची विनंती करतो. मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातूनच काम करत राहणार आहे."

Deshdoot
www.deshdoot.com