व्यावसायिकाचे ईमेल अकाऊंट हॅक करून घातला 'एवढ्या' कोटीला गंडा

व्यावसायिकाचे ईमेल अकाऊंट हॅक करून घातला 'एवढ्या' कोटीला गंडा

पुणे |प्रतिनिधी|Pune

देशविदेशात महागडी पेंटिंग्स खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचे ईमेल अकाऊंट हॅक करून 4.5 कोटीचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. मुंढवा पोलिस ठाण्यात (Mundhwa Police Station) याप्रकरणी फसवणुकीचा (fraud) गुन्हा दाखल (Crime) करण्यात आला आहे.

पुण्यातील ४८ वर्षीय व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. तो देशविदेशात महागडी पेंटिंग्स खरेदी विक्री (Buy and sell paintings) करण्याचा व्यवसाय करतो.

फिर्यादीची आंतरराष्ट्रीय कंपनी जेरार मार्टीशी (jerar Martyshi) मौल्यवाद पेटिंग खरेदी करण्याचा व्यवहार सुरु होता. गुन्हेगारांनी जेरार मार्टीच्या (jerar Martyshi) नावाने बनावट ईमेल आयडी (Fake E-mail Id) वापरून फिर्यादीशी संपर्क साधला. यावेळी फिर्यादीला जेरार मार्टी यांच्या नावाने ईमेल पाठवला. या मेलमध्ये बँक डिटेल पाठवून ईमेल क्रॅक (E-mail Crack) केला. या ईमेलद्वारे ७ ते ८ वेळा व्यवहार करण्यात आला. तसेच कंपनीने जेरार मार्टी यांच्या बँकेचा खातेक्रमांक समजून चोरट्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. तब्बल ४.५ कोटी रुपयांचा हा व्यवहार झाला. मात्र फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचं कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. ही फसवणूक २६ मार्च ते मे २०२१ दरम्यान झाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com