
नागपूर | Nagpur
येथील खापरी पुनर्वसन परिसरात एका उद्योजकाने स्वतःला कारमध्येच पेटवत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या उद्योजकाने त्याची पत्नी (wife) आणि मुलालादेखील जाळण्याचा प्रयत्न केला....
यातून मुलगा (son) आणि उद्योजकाची पत्नी बालबाल बचावले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग इतकी भयंकर होती की त्यात उद्योजकाचा (Businessman) जळून दुर्दैवी अंत झाला आहे.
रामराज गोपाळकृष्ण भट (Ramraj Gopalkrishna Bhatt) असे या उद्योजकाचे नाव आहे. आर्थिक तंगी असह्य झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजले. यात उद्योजकाची पत्नी संगीता आणि इंजिनिअर मुलगा नंदन हे दोघे जखमी झाले आहेत.
कार पेटल्याचे नागरिकांना निदर्शनास येताच त्यांनी पोलीसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बेलतरोडी पोलीस (Beltarodi Police) घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती.
उद्योजक भट याचा मृत्यू झाला होता तर त्यांची पत्नी आणि मुलगा हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.