नागपूरसह लातूरसाठी बससेवा सुरू

लवकरच एसटी पूर्ण क्षमतेने धावणार
नागपूरसह लातूरसाठी बससेवा सुरू


नाशिक | Nashik

कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर एसटी महामंड्ळाकडून नागपूर आणि लातूर या लांब पल्याच्या बसेस मंगळ्वारपासून सोड्ण्यास प्रारंभ झाला.

याआधी औरंगाबाद ,पुणे जळ्गांव, बोरिवली, ठाणे आदीसह इतर जिल्ह्यात बसेस धावत आहेत, राज्यात उदभवलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती.

करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यशासनाच्या निर्देशानूसार एसटी महामंडळाची सेवा ठप्प झाली होती.मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने एसटी महामंडळाला प्रवासी वाहतुकीस परवागनी देण्यात आलेली आहे.

या पार्श्वभुमीवर आंतर जिल्हा प्रवासी वाहतुकीबरोबरच लांब पल्ल्यांच्या मार्गावर देखील बसेस सुरु करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यादृष्टीने विभागातून नाशिक-नागपूर , नाशिक लातूर मार्गावर बसेस सुर करण्यात आल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसेसला मिळणार्‍या प्रतिसादानंतर आणखी मार्गावर बसेस सुरु करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यंानी दिली.

दरम्यान कोल्हापूरसाठी अद्यापही बस सोडली नसल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसात पूर्ण क्षर्मतेने बस सोड्ल्या जाण्याची शक्यता आहे. परिस्थिती आणखी सुधारल्यास एसटीच्या वतीने लांब पल्ल्याच्या बसेसचे नियोजन केले जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com