<p>मुंबई | Mumbai</p><p>मुंबई गोवा महामार्गावरील मार्गावरील कशेडी घाटात एका खाजगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. ही बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात </p>.<p>सात वर्षांच्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून सुमारे १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.</p>.<p>अपघातग्रस्त बस विरारहून कणकवलीला निघाली होती. बसमध्ये एकूण ३१ प्रवासी होते. चार वाजण्याच्या सुमारास कशेटी घाटात असताना या गाडीला अपघात झाला. त्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर, काही प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच '१०८' रुग्णवाहिका व एका स्वयंसेवी संस्थेची रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी पोहोचली. मदतकार्य अद्यापही सुरू आहे. गाडीतील बहुतेक प्रवासी संगमेश्वर तालुक्यातील आहेत. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. </p>