धक्कादायक! धावत्या एसटी बसचा फाटलेला पत्रा लागल्याने दोन तरुणांचे हात कापले

धक्कादायक! धावत्या एसटी बसचा फाटलेला पत्रा लागल्याने दोन तरुणांचे हात कापले

बुलढाणा | Buldhana

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात आज (१६ सप्टेंबर) विचित्र घटना घडली. धावत्या एसटी बसच्या (ST Bus) फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापले गेले. या दोनही तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते.

यावेळी याच मार्गावरुन मलकापूर आगाराची बस जात असताना चालकाच्या केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागून दोन तरुणांचे हात कापले गेले. हा अपघात इतका भीषण आहे की दोन्ही तरुणांचे हात अक्षरशः तुटून पडलेले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com