भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळली

दहा जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळली

मुंबई | Mumbai

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे.

या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहेत. दरम्यान, एनडीआरफचे पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरुच आहे.

तसेच या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवासी अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, भिवंडी परिसरात पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले दुःख..

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुर्घटनेबद्दल दुख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हंटले आहे, "महाराष्ट्रातल्या भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जीवित हानी दुःखदायी आहे. संकटाच्या या वेळी मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या शोक संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी. स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे."

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com