
मुंबई | Mumbai
दिल्लीमधील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या (Murder) प्रकरणाची पुनरावृत्ती पुन्हा दिल्लीत झाली आहे. एका प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन फ्रीजमध्ये लपवून ठेवल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ माजलेली आहे...
यापाठोपाठ आता पालघरमध्ये देखील (Palghar) अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची हत्या (Murder) करुन मृतदेह पलंगात लपवून ठेवला. पोलिसांनी (Police) प्रियकराला जेरबंद केले आहे.
पालघरच्या तुळींज येथे हे प्रेमी युगूल लिव्ह-इनमध्ये राहत होते. दोघांमध्ये रोज भांडण होत होती. एका भांडणामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीचा खून केला. त्यानंतर घरातील पलंगामध्ये प्रेयसीचा मृतदेह लपवून ठेवला.
घऱातून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली असता गादीत गुंडाळलेला तिचा मृतदेह पलंगात लपवून ठेवल्याचे आढळले.
दरम्यान, प्रियकराला पळून जाताना मध्य प्रदेशच्या नागदा येथे ट्रेनमधून पकडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.