
मुंबई | Mumbai
पालघर जिल्ह्यातील (Palghar District) मोखाडा तालुक्यात (Mokhada Taluka) बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची महाविद्यालयातून घरी परत जात असताना प्रियकराने (lover) भरदिवसा कोयत्याने वार करत गळा चिरून हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर प्रियकराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी (Police) त्याच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली होती. मात्र, शुक्रवारी रात्रीच या प्रियकर तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार की, अर्चना उदार (वय १८ वर्ष) असं हत्या झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर प्रभाकर वाघेरे (वय २२ वर्ष) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या मृत आरोपी तरुणाचे नाव आहे. मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत अर्चना उदार ही विद्यार्थीनी शिक्षण घेत होती. रयत शिक्षण संस्थेच्या गभालपाडा अनुदानित आश्रम शाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी (Education) जवळच असलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीत जात असे.
नेहमीप्रमाणे अर्चना ही आश्रमशाळेतून महाविद्यालयात गेली होती. यावेळी दुपारच्या वेळेस जेवणासाठी महाविद्यालयातून आश्रमशाळेच्या दिशेने परत जात असताना मागून आलेल्या तिच्या प्रियकराने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी त्याने हातातील कोयत्याने अर्चनावर वार करून तिची गळा चिरून हत्या केली. यावेळी अर्चनासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीने (Accused) घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर त्याने शुक्रवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
संशयित आरोपी प्रभाकर याचे अर्चनावर एकतर्फी प्रेम होते. माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, असे म्हणत आरोपी प्रभाकर हा अर्चनाला त्रास देत होता. पण अर्चनाने प्रभाकरला स्पष्ट नकार दिला होता. शुक्रवार (दि.०६) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अर्चना नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाली असता संशयित आरोपी प्रभाकर याने तिचा पाठलाग केला. माझ्या प्रेमाचा स्वीकार का करत नाही, असे म्हणत प्रभाकरने रागाच्या भरात अर्चनाच्या मानेवर कोयत्याने वार केले.
दरम्यान, या घटनेत अर्चनाला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंरतु, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर संशयित आरोपी प्रभाकर हा फरार झाला होता. तसेच पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके देखील रवाना केली होती. मात्र, पोलिसांच्या तावडीत सापडण्याआधीच प्रभाकर याने गळफास घेत आपली जीवयात्रा संपवली. या घटनेमुळे मोखाड्यात (Mokhada) एकच खळबळ उडाली आहे.