बॉक्सिंगपटू मेरी कोम यांनी घेतली पुण्यात करोना लस

बॉक्सिंगपटू मेरी कोम यांनी घेतली पुण्यात करोना लस

पुणे (प्रतिनिधि) - भारताच्या महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि लोव्हलिना बोरगोहेन यांनी पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतली.

पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये एलिट महिला बॉक्सर राष्ट्रीय शिबिर सुरू आहे. हे शिबिर जुलैपर्यंत चालणार आहे.ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या बॉक्सिंगपटूंसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मेरी कोम उपस्थित आहेत.

मेरी कोम सहा वेळा विश्वविजेती असून लोव्हलिनाने दोन वेळा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. मेरी कोम आणि लोव्हलिना व्यतिरिक्त, प्रशिक्षण आणि सपोर्ट स्टाफ टीमच्या चार सदस्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com