...तोपर्यंत 'नो ट्वीट्स'; नवाब मलिकांची हायकोर्टात हमी

...तोपर्यंत 'नो ट्वीट्स'; नवाब मलिकांची हायकोर्टात हमी

मुंबई l Mumbai

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Cabinet Minister Nawab Malik) यांची समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या परिवारावर सुरु असलेली आरोपांची मालिका आता काही काळापुरती स्थगित होणार आहे.

कारण नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay HC) NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात बोलण्यात मनाई केली आहे. नवाब मलिक यांनीही वानखेडे कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करणार नाही, अशी हमी नवाब मलिक यांनी दिली आहे.

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना आपल्या कुटुंबाविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करणारा आदेश देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने फेटाळल्याने त्याला समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी बुधवारी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर अपिलाद्वारे आव्हान दिले होते. त्या अपिलावर आज सुनावणी पार पडली.

मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबियांविरोधात पुढील सुनावणी म्हणजेच ९ डिसेंबरपर्यंत कोणतंही वक्तव्य करु नये असं सांगितलं आहे. दरम्यान नवाब मलिक यांनीदेखील कोर्टाला कोणतंही वक्तव्य न करण्याची हमी दिली आहे.

दरम्यान, समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.

प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. नवाब मलिक यांच्याविरोधात त्यांनी सव्वा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावाही दाखल केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com