मुंबई l Mumbai

वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वरवरा राव यांना ६ महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मेडिकल ग्राऊंडवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना जामीन मिळालेल्या कालावधीत मुंबईमध्येच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच चौकशीसाठी सुद्धा त्यांना हजर राहावं लागेल, असे न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटले आहे.

वरावरा राव यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात (Bhima Koregaon Case) पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी त्यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरु आहे. ते ८२ वर्षांचे आहेत. त्यात त्यांची प्रकृतीही फारशी चांगली नसते. त्यामुले वैद्यकीय कारणास्तव त्यांना तातीडच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. वरावरा राव यांच्या पत्नी हेमलात यांनी एक स्वतंत्र याचिका दाखल करुन ही मागणी केली होती. या याचिकेवर प्रदीर्घ काळ सुनावणी झाली. त्यानंतर न्यमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीश पितळे यांच्या खंडपिठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. शिवाय याचिकेवर निर्णय होईपर्यंत वरावरा राव यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातच ठेवण्यात यावे असे सप्ट करण्यात आले होते.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने वरवरा राव यांच्या जामिनाला विरोध केला होता. वरवरा राव यांच्यावर लावण्यात आलेले कलम हे खुपच गंभीर असून भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात ते मुख्य आरोपींपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देवू नये, असा युक्तीवाद एनआयएने केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांकडून नोव्हेंबर २०१८ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

कोण आहेत वरवरा राव?

वरवरा राव हे प्रसिद्ध तेलुगू कवी आहेत. वरवरा राव यांचा जन्म वारांगाळ जिल्ह्यात झाला आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांनी कवितांचे लेखन करण्या सुरुवात केली. हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी तेलुगू साहित्यातमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. राव यांच्यावर मार्क्सवादी तत्वज्ञानाचा प्रभाव राहिला असून त्यांनी प्राध्यापक म्हणून देखील काम केले आहे. राव यांनी १५ कवितासंग्रहांचं लेखन केले आहे. आंध्रप्रदेशातील विविध सामाजिक आंदोलंनामध्ये त्यांचा सहभाग राहिला असून विविध प्रकरणांमध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांना यापूर्वी देखील अटक केली होती.