मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करून पकडलेल्या टोळीचे बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन?

पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केली शक्यता
मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करून पकडलेल्या टोळीचे बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन?

पुणे(प्रतिनिधी)

पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करून पकडलेल्या टोळीचे बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन असण्याची शक्यता पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवड अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरातून वाहनाचा पाठलाग करून 20 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन ड्रग्स पकडले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. संबंधित टोळीचे मुंबईमधील बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे

चाकण परिसरातील शिरूर – चाकण मार्गावरून अज्ञात मोटारीने काही व्यक्ती मेफेड्रोन ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, संबंधित ठिकाणी सापळा लावण्यात आला. परंतु आरोपी यांनी मोटार थांबवली नाही. त्यांचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला आणि शेल पिंपळगाव येथे त्यांना पकडले, पाच ही आरोपीकडे असलेल्या बॅगेत 20 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन ड्रग्स आढळले. या कारवाईमध्ये आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com