मुंबईत सर्व दुकानं सुरू करण्यास मुभा

मुंबईत सर्व दुकानं सुरू करण्यास मुभा

सकाळी 9 ते 7 पर्यंतची वेळ

मुंबई | Mumbai -

येत्या 5 ऑगस्टपासून मुंबई महापालिका BMC हद्दीतील सर्व दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच मुंबईत दारूच्या दुकानात काऊंटरवर विक्री सुरू होईल. याआधी दुकानांसाठी सम-विषमचं सूत्र वापरण्यात येत होतं. मात्र आता सरसकट परवानगी देण्यात आली आहे. याबद्दलची नियमावली पालिकेनं प्रसिद्ध केली आहे. BMC allows shops in Mumbai to remain open on all days

मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार, मिशन बिगीन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकानं सकाळी 9 ते 7 पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. तसंच दारुची दुकानंही सुरू केली जाणार आहेत. यापुढे आता काऊंटरवर दारू मिळणार आहे. मात्र यादरम्यान घालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. याआधी एक दिवसाआड दुकानं सुरु करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र यात आता बदल करण्यात आला आहे.

येत्या 5 ऑगस्टपासून मॉल्स आणि बाजार संकुलं पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मॉल्स आणि बाजार संकुलं सुरू करता येणार आहेत. पण मॉल्स आणि बाजार संकुलांमधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही. पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटला किचन सुरू ठेवता येईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com